Wednesday, February 18, 2015

दीनदुबळ्यांची माता रमाई



( ७ फेब्रुवारी रमाई जयंती )
दीनदुबळ्यांची माता रमाई
यांना जयंती निमित्त
कोटी कोटी अभिवादन.

मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l 
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द महार म्हणतात या जातीला l

Wednesday, February 4, 2015

गुजरात विधानसभेत बाबासाहेबांचे तैलचित्र


गुजरात मधील दलित पेंथरने बाबासाहेबांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यासाठी आंदोलन करुन ते यशस्वी केले होते. विधानसभेत लावण्यासाठीचे तैलचित्र बरयाच दिवसान पासुन चित्रकाराच्या घरात पडुन होते. या तैलचित्राला पैंथर नेत्यानी विधानसभेत लावले. बाबासाहेबांच्या तैलचित्रासह तत्कालीन पेंथर नेते वालजीभाई पटेल, नारण वोरा आणि चित्रकार शांतिलाल शाह आहेत.


Tuesday, February 3, 2015

नामांतर लढ्या साठी गुजरात मध्ये दलित राहत समिति


महाराष्ट्रात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरा वेळी मराठावाड्यातील दलित बांधवांवर अनगिनत अमानुष अत्याचार झाले. त्या वेळी गुजरात मध्ये महाराष्ट्रातील दलित बांधवांना मदत करण्यासाठी गुजरात दलित राहत समिति ची स्थापना करण्यात आली होती. त्या समितिने गुजराती दलित बांधवांना तन मन धनाने मराठी दलित बांधवांनां मदत करण्याची आवाह्न केले होते. या समितिची स्थापना अनुभाई राठोड, सोमचंद मकवाणा, विनुभाई भैरवीया, वालजीभाई पटेल, बकुल वकील, श्रीधन मकवाणा, आनंद परमार आणि एस. ए. सोनवणे या भीम सैनिकानी केली.  

Friday, January 30, 2015

आम्ही आह्वान करतो

माझा देश माझी सत्ता माझा 18वा ब्लोग आहे. या ब्लोग द्वारे आम्ही गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या मधील चळवळीचा निखळलेला दुआ पुन्हा सान्धु इच्छीतो.

आम्ही गुजरात आणि महाराष्ट्राच्या दलित-बहुजन चळवळीला जोडु इच्छी तो. या ब्लोगवर आम्ही गुजरात राज्यातील घटनान बद्दल तुम्हाला सांगत राहु. आम्ही आह्वान करतो की तुम्ही पण महाराष्ट्रतील घटनांन बद्दल निहाल.

आम्हाला आशा आहे की चळवळी बद्दल प्रेम असनारे आणि चळवळीत क्रियाशील असनारे बहुजन बांधव आम्हाला या कार्यात सहकार्य करतील

जय भीम.

राजु राजेश सोलंकी